चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्प: अखेर चाचणी झाली; आता लोकार्पणाची प्रतीक्षा

Foto

 
औरंगाबाद: शहरात उभारण्यात येणाऱ्या चार कचरा प्रक्रिया प्रकल्प पैकी चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्र पूर्णत्वास येत असून, वीज जोडणी अभावी या केंद्रावर कचऱ्यावर  प्रक्रिया होत नव्हती. आता वीज जोडणी झाल्याने काही मुहूर्त तळल्यानंतर का होईना या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची आज बुधवारी चाचणी घेण्यात आली. आता या प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकर्णकरिता आणखी किती दिवस  प्रतिक्षा करावी लागणार  असा सवाल परिसरातील शेतकऱ्याकडून व्यक्त केला जात आहे. 

गेल्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी शहरातील कचरा नारेगाव कचरा डेपाेत टाकण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडी निर्माण झाली होती यातून मार्ग काढण्याकरिता कचरा संकलनाच्या खाजगी करण्यासह शहरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले त्याकरिता आवश्यक असलेला निधी शासनाच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आला. प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. लोकसभा निवडणुकीत याच मुद्द्यावरून कोंडी झाल्यानंतर विधानसभेच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले होते. विज जोडणी करता प्रशासनाने महावितरणकडे अर्ज केला होता नियोजनानुसार दोन जून रोजी या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे चाचणी घेण्यात येणार होते परंतु वीज जोडणीचे काम पूर्ण न झाल्याने ममता प्रशासनाचा दावा फोल ठरला होता आज बुधवारी बरेच मुहूर्त कळल्यानंतर या150 टन क्षमता असलेल्या प्रक्रिया प्रकल्पाचे चाचणी घेण्यात आली. इतर केंद्र सुरू होईपर्यंत येथे सुमारे अडीचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यावेळी मनपा आयुक्त डॉ. निपून विनायक, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी,घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोम्बे, विजय पाटील आदींची उपस्थिती होती.

परिसरातील शेतकऱ्यांचा भोंबे यांना घेराव
प्रक्रिया केंद्रावरील कचर्‍याचा ढीग दिवसागणिक वाढत असून, प्रक्रिया केंद्रा जवळून रोडने जातानादेखील नाकाला रुमाल लावावा लागत आहे. कचऱ्याचा डोंगर अगोदर हटला पाहिजे. यासह दूषित पाणी परिसरात जाऊ नये अशी मागणी करीत परिसरातील बाळासाहेब दहीहंडे, संतोष रिठे दिगंबर कावडे, अंकुश कावडे, संजू गोटे आदींनी घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोम्बे यांना घेराव घातला होता.

 किरकोळ कामे शिल्लक 
विजेचा प्रश्न मिटला, विंडोज प्लॅटफॉर्म, डीसॉर्टइंग  एरिया पण तयार आहे. काही कामे बाकी असून,यात कंपाउंड वॉल सारखी काही किरकोळ कामे बाकी असून, दहा दिवसात ही सर्व कामे होणे अपेक्षित असल्याचे भोंबे म्हणाले.
 या केंद्रावर आपण कचरा प्रक्रिया सुरू करू शकतो जी किरकोळ कामे शिल्लक आहे अशी कामेही होत राहतील असं विनायक म्हणाले. कचऱ्याचे ढीग साचले असल्याबाबत त्यांना विचारले असता तेथे माशा वगैरे होऊ नये म्हणून यंत्रांच्या सहाय्याने स्क्रीनिंग करण्याकरिता प्रशासनाचा विचार असून सर्वच प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी स्क्रीनिंग करण्याचा विचार आहे. याकरिता यंत्रसामग्री कायम स्वरूपी घ्यायची का? याबाबत अजून पूर्णपणे निर्णय घेण्यात आलेला नाही. यामध्ये बायो मायनिंग, बायोकॅपिंग असे प्रकार असतात. अभ्यासानंतर तेथे काय उपयुक्त राहील त्यावरून ठरवले जाईल. यात पैसे अधिक लागण्याची शक्यता आहे. सलीम अली सरोवर याचा कामा वेळीदेखील असा अनुभव आलेला आहे. कमीत कमी खर्चात काम व्हावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे असेही विनायक म्हणाले.